गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात गणरायाला भक्तीपूर्ण निरोप

खामगाव (गावाचा प्रश्न नेटवर्क न्युज) ः मागील दहा दिवसापासून विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाला खामगाव शहरात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूत मोरया..पुढच्या वर्षी लवकर या!“ जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, जंगी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत खामगाव शहरातील शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 17 व शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 12 … Read more

बकरी ईद व सण उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक

खामगाव (प्रतिनिधी) ः बकरी ईद व सण उत्सवानिमित्त शहरातील जातीय सलोखा आणि भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी तसेच येथील कायदा सुव्यवस्था योग्य ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्सवा दरम्यान कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. बकरी ईद … Read more

हिंगणा कारेगाव येथे गुरुवारी आंबेडकरी कलावंतांची गीत श्रध्दांजली

खामगाव (प्रतिनिधी)ः महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कलावंताचे महान कलावंतास गीत गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ख्यातनाम कलावंत डॉ.भिमसेन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवार 5 जून 2025 रोजी हिंगणा कारेगाव येथे आंबेडकरी कलावंतांची गीत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अशोकभाऊ सोनोने तर उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे … Read more

भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त खामगावात कँडल मार्च

खामगाव- स्थानिक शंकरनगर भागातील समता क्रीडा मंडळाच्या वतीने आज 12 मे 2025 रोजी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त शहरातून कँडल मार्च काढण्यात आला. शंकर नगरातील प्रवज्जा बुध्द विहार येथून सायंकाळी 6 वाजता कँडल मार्चला सुरूवात करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कँडल मार्च पोहचला असता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानंतर … Read more

मुलींनो पालकांच्या भावनांचा विचार करावा!

जिल्ह्यातून जानेवारी महिन्यापासून त्ो 29 एप्रिलपर्यंत 450 जण बेपत्ता खामगावः जिल्ह्यातून गेल्या चार महिन्यात महिला-पुरुष, तरुणी-तरुण असे एकूण 450 जण बेपत्ता झाले आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात 102, फेब्रुवारी महिन्यात 101, मार्च महिन्यात 117 तर 1 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत 122 जण बेपत्ता … Read more

आधार, ई-सेवा केंद्रांत नागरिकांची लूट

प्रशासनाची डोळेझाक, तिप्पट-चौपट रक्कमेची केली जाते आकारणी खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव तालुक्यातील ई-सेवा केंद्रांत विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शासकीय शुल्क निश्चित केले आहे. मात्र त्याच्या तिप्पट, चौपट रक्कम नागरिकांकडून आकारली जाते. विचारणारे कोणीच नसल्याने केंद्रचालकांची मनमानी सुरू आहे. कागदपत्रे मिळावी, यासाठी सुरू असलेली धावपळ आणि कारवाईबाबत अनास्था याचा नेमका फायदा घेत काही केंद्रचालकांचा लुटीचा धंदा … Read more

राजमाता जिजाऊ रथयात्रा आज खामगावात

खामगाव (प्रतिनिधी)ः राजमाता माँ जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ शिव शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता समानता बंधुता वादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे, या करिता मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडी अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे. ही रथ यात्रा खामगाव शहरात आज … Read more

मुलींच्या जन्मदरात घटःलग्नासाठी मुलांना मिळेना मुली

खामगाव (मनोज जाधव) – मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या, नातवांना मांडीवर खेळवले, की आम्ही डोळे मिटायला मोकळे अशी माफक अपेक्षा पूव पालकांची होती. मात्र गेल्या काही वर्षात मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात घटली. त्यामुळे प्रत्येक पालकांच्या मुलींच्या अपेक्षा वाढत गेल्या. पालक आपल्या मुलीसाठी चांगल्यातील चांगले स्थळ शोधू लागले. त्यामुळे सामान्य कुटूंबातील मुलांचे लग्न होणे खूप अवघड झाले … Read more

नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाजवळ अलोट भीमसागर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांचे अभिवादन छत्रपती संभाजीनगर (मिलिंद आठवले)ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत्ूान आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी होत आहे. सामाजिक संस्था, विविध पक्ष, संघटनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ नामविस्तार दिनाला सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची पावले विद्यापीठ … Read more

अमित शहा यांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ खामगावात निदर्शने

विविध राजकीय पक्ष व आंबेडकरी संघटनांचा सहभाग खामगाव (प्रतिनिधी)ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसून येत आहे. अमित शहा यांच्या निषेधार्थ 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंबेडकर प्रेमी व विविध राजकीय पक्षांच्यावतीने अमित शहा यांच्या … Read more