हिंगणा कारेगाव येथे गुरुवारी आंबेडकरी कलावंतांची गीत श्रध्दांजली

खामगाव (प्रतिनिधी)ः महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कलावंताचे महान कलावंतास गीत गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ख्यातनाम कलावंत डॉ.भिमसेन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवार 5 जून 2025 रोजी हिंगणा कारेगाव येथे आंबेडकरी कलावंतांची गीत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अशोकभाऊ सोनोने तर उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे हे राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभयदादा इंगळे, दिलीपभाऊ जाधव, शरदभाऊ वसतकार, प्रा.माणिक जाधव तर प्रमुख उपस्थितीमध्ये शांताराम पाटेखेडे, संघपाल जाधव, राजेश हेलोडे, गणेशभाऊ चौकसे, शिवाजीराव चव्हाण हे राहणार आहेत. यावेळी सुखलाल इंगळे, बन्सी सावळे, सारंग फुलकर, जयदिप वानखडे, विनोद आठवले, एस.एस.हातोले, भगवान सिरसाट,दयानंद इंगळे, विजय मांडकेकर, संघपाल गवई, जोगेंद्र हिवराळे, गोविंदराव हिवराळे, संजय जाधव, विश्वंभर सिरसाट, सुरज आतीश, एस.के.जाधव, प्रविण इंगळे, साहेबराव वाकोडे, दौलतराव वाकोडे, अनिल शेगोकार, धरम बांगर, गौतम इंगळे, रत्नमाला गवई, कल्पा मांडकेकर, कोमल वानखडे, देवानंद हिवराळे, भिमराव हिवराळे, दयाराम सावदेकर, गुलाब गवई, साहेबराव इंगळे, प्रकाश शाहीर, राजू हिवराळे या गायक कलावंताची संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी मनोजराजा गोसावी, शाहीर डी.आर.इंगळे, अशोक निकाळजे, प्रशांत शिंदे, मेघानंद जाधव, प्रा.किशोर वाघ, कुणाल बोदडे, गौतम हराळ, राहुल कांबळे, विकास राजा, नागसेन सावदेकर, सपनाताई खरात, रिताताई खंडारे, अश्विनी रोशन, धम्मानंद सिरसाट या गायक कलावंताची उपस्थिती लाभणारआहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक न्यु समता क्रीडा मंडळ, बुद्धविहार समिती, संघमित्रा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment