तिहेरी अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

चिखली – मेहकर रोडवरील खैरव फाट्यावरील घटना
चिखली (प्रतिनिधी)ः चिखली – मेहकर रोडवरील खैरव फाट्यावर आज 4 मे रोजी दुपारी तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात घाटनांद्रा येथील एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक, कार आणि मोटारसायकलचा तिहेरी भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा झाला. या तिहेरी अपघातात मोटरसायकलवरील गणेश यादव गायकवाड वय 45 व त्यांची पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड वय 40, मुलगा कृष्णा गणेश गायकवाड वय 15 यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होत्ो, आणि त्यांना चिखली येथील डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त््याातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच, चिखली पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतरांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होत्ो. वाहनाचा अतिवेग किंवा चुकीचा ओव्हरटेकमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. किंवा, ट्रक आणि कारच्या चालकांच्या निष्काळजीमुळे तिघांचा बळी गेला, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. या अपघातात पती, पती आणि मुलाच्या मृत््यूाने घाटनांद्रा गावावर शोककळा पसरली आहे.