विविध राजकीय पक्ष व आंबेडकरी संघटनांचा सहभाग
खामगाव (प्रतिनिधी)ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसून येत आहे. अमित शहा यांच्या निषेधार्थ 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंबेडकर प्रेमी व विविध राजकीय पक्षांच्यावतीने अमित शहा यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून-बुजून अपमान केला आहे. अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा व एनडीए सरकार हे पायउतार झालेच पाहिजे. अशी मागणी यावेळी आंबेडकर प्रेमींनी केली आहे. सदर आंदोलनामध्ये गौतम गवई सरचिटणीस, तेजेन्द्रसिंह चव्हाण कार्याध्यक्ष काँग्रेस युवादल, धनंजय देशमुख सचिव प्रदेश काँग्रेस, भाई बाबुराव सरदार आंबेडकरी नेते भूमी मुक्ती मोर्चा, गणेश माने माजी नगराध्यक्ष, अजय तायडे प्रदेश सचिव ओबीसी काँग्रेस, किशोर भोसले माजी नगरसेवक, सरस्वती खासणे माजी नगराध्यक्ष, प्रकाश दांडगे रिपब्लिकन सामाजिक संघटना, संघपाल जाधव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव, दादाराव हेलोडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पंजाबराव देशमुख ज्येष्ठ वारकरी, अंबादास वानखडे, संजय बगाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, संभाजीराव टाले राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, व्ही एम भोजने ज्येष्ठ आंबेडकरी नेते, श्रीराम खेलदार तालुकाध्यक्ष शिवसेना ठाकरे गट, अतुल शिरसाट जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, विकास चव्हाण, अमित तायडे जिल्हाध्यक्ष यंग ब्रिगेड, विजय बोदडे यांच्यासह आदींनी आंदोलनात उपस्थिती होती.