राजमाता जिजाऊ रथयात्रा आज खामगावात

खामगाव (प्रतिनिधी)ः राजमाता माँ जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ शिव शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता समानता बंधुता वादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे, या करिता मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडी अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे. ही रथ यात्रा खामगाव शहरात आज 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता येणार आहे. ही रथ यात्रा शहरात शेगाव नाका येथून मार्गक्रमण करित सामान्य रुग्णालयातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात येईल. यांनतर बस स्टॅन्ड, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन, महाराजा मसाला समोरून, अर्जुन जलमंदिर चौक, भुसावळ चौक, निर्मल ट्रर्निंग, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे माँ. जिजाऊ छ. शिवाजी महराज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन करुन पुन्हा याच मार्गाने परत भारत कटपीस, जय भारत चौक, जगदंबा चौक, मोहन टॉकीज चौक, फरशी चौक, थोर बलिदानी क्रांतीकारी शहीद भगतसिंग पुतळा पूजन व अभिवादन, एकबोटे चौक, चंदनशेष चौक, टॉवर चौक महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन, हॉटेल त्ुाळजाई येथे स्वागत व सत्ा2कार सभा कार्यक्रम होईल यानंतर सिव्हील कोर्ट चौक, जलंब नाका चौक, सुटाळा खुर्द, सुटाळा बु., एम आयडीसी चौक, नंतर नांदुरा, मलकापूर करीता ही रथयात्रा प्रस्थान करणार आहे. तरी या रथ यात्रेमध्ये खामगांव शहर व ग्रामीण परिसरातील समस्त सकल मराठा समाज बांधवांनी व अठरापगड जाती धर्मातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोणत्याही निमंत्रण आमंत्रणाची फोनची वाट न पाहता स्वयंस्फूतने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज खामगांव, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा पाटिल सेवाभावी संस्था, मराठा पाटिल सेवा मंडळ, देशमुख समाजोती मंडळ, मराठा पाटिल युवक समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment