डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांचे अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (मिलिंद आठवले)ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत्ूान आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी होत आहे. सामाजिक संस्था, विविध पक्ष, संघटनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठ नामविस्तार दिनाला सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची पावले विद्यापीठ प्रवेद्वाराकडे वळल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत्ूान आलेल्या भीमबांधवांनी आपल्या मुलाबांळासह मोठ्या शिस्तीत विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली. सकाळी बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागात्ूान आलेल्या भीमसैनिकांची विद्यापीठ प्रवेशद्वारावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरात रोषणाई करण्यात आली. आज पहाटेपासून विद्यापीठ प्रवेशद्वारावर अनुयायी येत होत्ो. अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांच्या स्मृती जपणाऱ्या शहीद स्तंभाला अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला. पुस्तकविक्रीचे स्टॉल, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांनी लक्ष वेधले. परिसरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावण्यात आली. विविध शहरांत्ूान आलेल्या विक्रेत्यांनी वैचारिक पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती. दिनदर्शिका, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लहान-मोठे पुतळे, महापुरुषांची छायाचित्रे, फोटो विक्रीची दुकानेही होती. सामाजिक संघटना, पक्ष, कर्मचारी संघटनांतर्फे अन्नदान, पाणी वाटप, महारक्तदान शिबिर घेण्यात आले.
