महापरिनिर्वाण दिनः खामगावात कँडल मार्च
खामगाव (प्रतिनिधी)ः भारतरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी समता क्रीडा मंडळाच्या वतीने सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून कँडल मार्च काढण्यात आला होता. भारतरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कँडल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी सर्व अनुयायांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते.