मुलींच्या जन्मदरात घटःलग्नासाठी मुलांना मिळेना मुली

खामगाव (मनोज जाधव) – मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या, नातवांना मांडीवर खेळवले, की आम्ही डोळे मिटायला मोकळे अशी माफक अपेक्षा पूव पालकांची होती. मात्र गेल्या काही वर्षात मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात घटली. त्यामुळे प्रत्येक पालकांच्या मुलींच्या अपेक्षा वाढत गेल्या. पालक आपल्या मुलीसाठी चांगल्यातील चांगले स्थळ शोधू लागले. त्यामुळे सामान्य कुटूंबातील मुलांचे लग्न होणे खूप अवघड झाले आहे.
काही वर्षांपूव उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी संकल्पना होती. पण काळाच्या ओघात प्रचंड उलथा पालथ होत गेली. आपल्या हट्टपाई व वंशाच्या दिव्यासाठी मुलींच्या पणत्या विझवत त्यांच्या जन्मावरच घाला घातला गेला. सोई सुविधा झाल्याने मुली शिकून मोठ्या झाल्या. सहाजिकच जोडीदाराबाबत त्यांच्या अपेक्षाही बदलत गेल्या.पूव तिसऱ्या स्थानावर असणारी नोकरी पहिल्या स्थानावर आली. शेती व शेतकरी अडगळीत पडले हे लक्षातही आले नाही. यातच चित्रपट, टीव्ही, मालिका यामधून शेती व शेतकरी यांच्याबाबत विदारक चित्र निर्माण केले गेले. विशेष म्हणजे पूवच्या काळी मुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते घरचे लोक जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागत होता. मुलींना बोलण्याची संधी नव्हती. पण आता काळ बदलला. मुली ही मुलांबरोबरीने शिकू लागल्या. नोकरी करु लागल्या. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ही त्यांना मिळाले. त्यामुळे आता मुलीही सक्षम झाल्या. त्याही चुल-मूल रुढी, परंपरा झुगारुन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांच्याही अपेक्षा वाढत गेल्या. लग्न करण्याचा निर्णयही त्या घेऊ लागल्या आहेत. आणि त्याला पालकांची ही संमती आहे. महत्वाचे म्हणजे जे लोक शेतकरी आहेत. त्यांंना देखील असे वाटते की, आपली मुलगी शिकलेली नसेल तरीही नोकदार नवरा हवा हा अट्टाहास धरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीच शेतीला दुय्यम दर्जा दिल्यामुळे ही मुर्लांना मुली मिळेनाशा झाल्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुलींच्या कुटुंबियांना पैसे देऊनही लग्न करण्याची पद्धत सुरु झाली त्याच बरोबर काही ठिकाणी अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न लावले गेले. तेही योग्य अटींची पूर्तता करुनच.त्याचबरोबर बरेच तरुण आज बेरोजगार आहेत. काहींनी एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही हाती काही लागले नाही. पाच- सहा वर्ष त्यांचे वाया गेले. वय झाले त्यामुळे हीच तरुण मुले खेडेगावात येऊन छोटा मोठा व्यवसाय करायला लागले. पण लोकांनी त्यांनाही मुली देणे पसंत केले नाही. सर्वजण नोकरीच्या पाठीमागे लागले आणी शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्नासाठी शेतीकडे दुर्लक्ष केले तर शेतीतून उत्पन्न निघणार कसे व शेतीचे भविष्य काय असेल ही चिंतेची बाब आहे. त्यावर पर्याय काढण्यासाठी समाज व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. आभासी जगासारखे जगण्यासाठी आज काल मुलींकडून नोकरदार मुलांनाच पसंती दिली जात आहे.

स्त्री भ्रूण हत्येचे दुष्परिणामः पूव सरासरी मुला-मुलींचा जन्मदर जवळपास समान होता. अपेक्षांचे ओझे कमी होते. पण मुलगाच पाहिजे या हट्टापाई मुलगी नकोशी झाली. स्त्री भ्रूण हत्या करण्यात आल्या. मुलींचे प्रमाण कमी झाले. त्याचे दुष्परिणाम आताच्या पिढीला भोगावे लागत आहेत. शेतकरी, छोटे व्यावसायिक, कामगार यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना याचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत आहेत.

Leave a Comment