जिल्ह्यातून जानेवारी महिन्यापासून त्ो 29 एप्रिलपर्यंत 450 जण बेपत्ता
खामगावः जिल्ह्यातून गेल्या चार महिन्यात महिला-पुरुष, तरुणी-तरुण असे एकूण 450 जण बेपत्ता झाले आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात 102, फेब्रुवारी महिन्यात 101, मार्च महिन्यात 117 तर 1 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत 122 जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये आहे.
मागील वर्षभरापासून प्रेमसंबंधात्ूान अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका आठवड्यात्ूान एक अल्पवयीन मुलगी गायब होत आहे. त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं, हे यानिमित्ताने आता खरे ठरू लागले आहे. तर गायब झालेल्या मुलींमध्ये 14 त्ो 18 व त्यावरील वयोगटातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगीही प्रेमात पडून प्रियकरासोबत धूम ठोकत आहे. त्यामुळे पालकांची देखील चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे मुली बेपत्ता होणाऱ्या घटनेला पालकही त्ोवढेच जबाबदार आहेत. कारण पालकांकडून आपल्या पाल्यांना विश्वासात घेतले जात नाही. कामाच्या ओघात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच गैरफायदा प्रियकर मुले घेताना पाहायला मिळत आहे. मुलींना वेगवेगळे आमिष दाखवत दोघेही सैराट होतात. त्यामुळे पालकांनी कामात्ूान वेळ काढत आपल्या मुलीकडे देखील वेळ दिले पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांना कुटुंबाचे प्रेम दिले पाहिजे.
अलीकडच्या काळात न सांगता निघून जाणे किंवा पळून जाणे याचे प्रमाण वाढले आहे. समोर आलेली शासकीय आकडेवारी हीच भुवया उंचावणारी आहे. मात्र, ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला किंवा मुलगी घरून निघून गेल्यानंतर अनेक पालक बदनामी पोटी तक्रार दखलच करत नसल्याचे बोलल्या जात्ो. मात्र त्यांच्या जीवाची कशी घालमेल होत असेल, याचा विचारही मुलींनी करायला हवा.
