खामगाव- स्थानिक शंकरनगर भागातील समता क्रीडा मंडळाच्या वतीने आज 12 मे 2025 रोजी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त शहरातून कँडल मार्च काढण्यात आला. शंकर नगरातील प्रवज्जा बुध्द विहार येथून सायंकाळी 6 वाजता कँडल मार्चला सुरूवात करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कँडल मार्च पोहचला असता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. कँडलमार्च मध्ये समाज बंधू भगिनी शुभ्र वस्त्र धारण करून सहभागी झाले होते.
