अमित शहा यांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ खामगावात निदर्शने

विविध राजकीय पक्ष व आंबेडकरी संघटनांचा सहभाग खामगाव (प्रतिनिधी)ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसून येत आहे. अमित शहा यांच्या निषेधार्थ 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंबेडकर प्रेमी व विविध राजकीय पक्षांच्यावतीने अमित शहा यांच्या … Read more

खामगावात “ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर” रुग्णसेवेत रुजू

पहिल्या कार्डीयाक ॲम्बुलन्ससह 24 तास वैद्यकीय सेवा तर उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला महिलेला जीवदान खामगाव (प्रतिनिधी) येथील डॉ.निखील संजय ठाकरे व डॉ. सौ. पूजा निखिल यांच्या ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअरचा शुभारंभ रविवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प.पू.शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. खामगावमध्ये प्रथमच पहिली कार्डीयाक ॲम्बुलन्स ठाकरे हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणली असून … Read more

लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिला निकषात अडकणार!

घरात चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेस ठरणार अपात्र खामगाव (प्रतिनिधी): लाडक्या बहिणींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर नसावे, लाभाथ महिलेच्या घरात चारचाकी वाहन नसावे यासह अन्य निकष लागू करण्यात आल्याने लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिला योजनेतून बाहेर पडणार आहेत. महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 1500 रुपयांनी की 2100 रुपयांनी मिळणार … Read more

बाळापूर फैलात 50 दिवसांपासून नळाला पाणी नाही

नागरिकांची न.प.वर धडक, आंदोलनाचा इशारा खामगांव (अमोल बुट्टे) : स्थानिक बाळापूर फैल भागातील काही घरांच्या नळामध्ये मागील 50 दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुध्दा न.प. कडून दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आज 9 डिसेंबर रोजी नागरिकांनी न.प.मध्ये धडक देवून न.प.मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. … Read more

शेगावात 11 जानेवारी रोजी भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन

समजाच्या एकत्रीकारणासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – प्रदेश सचिव राहुल चोपडे नांदुरा( प्रतिनिधी): भाट समाजाच्या प्रगतीसाठी तसेच एकत्रीकरण करून सर्वांगीण विकासासाठी अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या वतीने 11 जानेवारी 2025 रोजी माळी भवन शेगाव येथे भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन व वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे भाट समाजाच्या विकाससाठी सर्व भाट समाज बांधवांनी शेगाव … Read more

कवीतांचं पिक

मी माझ्या मनाच्या कसदार शेतात शब्दांची पेरणी केली! भाव-भावनांचं खत दिलं, कल्पनेचं पाणी दिलं, प्रतीभेची रखवाली ठेवली, आसवांची फवारणी केली, अन् काय आश्चर्य….. माझ्या मनाच्या शेतात कवीतांचं दमदार, शानदार,डौलदार पिक आलं…!! कवी:- अशोक आगरकर(खामगांव) मोबा. 7262992760

सिमेंट रस्त्याऐवजी डांबर बरे !

ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था, जागोजागी खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त खामगावः शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा सिमेंट रस्ते असावे, या महत्वाकांक्षी हेतूने सरकार सिमेंट रस्ते बांधत आहे. परंतु केलेले बांधकाम काही महिन्यातच भग्न होत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील सिमेंट रस्ते खड्डेमय झाले असून गाववासीयांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. … Read more

महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

मुंबई–भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68 वी पुण्यतिथी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 6 डिसेंबर … Read more

मंत्रिपदासाठी ‘महायुतीत रस्सीखेच

नेता निवडण्यासाठी आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मुंबई- भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याशी दोनदा झालेल्या चर्चेनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सक्रिय झाले. पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंगला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नेता निवडण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आज बुधवार पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत होत आहे; तर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी होणार … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांना किडीचा धोका

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त््याामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेला पश्चिमी चक्रवात शमल्याने तिकडून येणाऱ्या … Read more