नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना
खामगाव (प्रतिनिधी)ः नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील जय बजरंग विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी शाळेत वर्ग सुरू असताना गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेकला प्रश्न विचारले. मात्र, या विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून शिक्षकाने विवेकला 100 उठाबशा काढायला लावल्या. त्यानंतर त्याच्या आई वडिलांचा देखील अपमान केला. आई वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने शाळा मधेच सोडून विवेक घरी आला आणि सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर, त्याने गळफास घेऊन आपले आयुष संपविले. या घटनेनंतर, संबंधित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाला बेदम मारहाण देखील केली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध कलम 107 भान्यासं 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं? विनायकच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, शिक्षक सूर्यवंशी यांनी आपला छळ केला. इतकच नाही तर त्यांनी आपल्या पालकांविषयी अपशब्द वापरून त्याचा अपमान केला. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
काही तासातच होताच नव्हतं झालंः 16 वर्षाचा विनायक हा सकाळी 11 वाजता शाळेतील वर्गात होता. अन् दुपारी 1.40 वाजता मधल्या सुट्टीत तो शाळेतून बाहेर पडून आणि काही तासातच होत्याचं नवहतं झालं. यामुळे सुसंस्कृत बुलडाणा जिल्हा आणि उच्च शैक्षणिक परंपरा असलेले जिल्हयाचे शैक्षणिक वर्तुळ अक्षरशः हादरले आहे.
