पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचे खामगावातून अपहरण

खामगाव (प्रतिनिधी)ः पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वषय तरुणीचे संशयास्पदरीत्या अपहरण करण्यात आले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील चिंतामणी मंदिर परिसरातून पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या 17 वषय तरुणी संजिवनी हिचे दि. 28 एप्रिल रोजी सकाळी 5.30 वाजता संशयास्पदरीत्या अपहरण झाले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 137 (2) भान्यासं … Read more

भेंडवळची भविष्यवाणीः देशावर मोठे संकट, युद्धाचे सावट

* राजकीय तणाव * पावसाची स्थिती सर्वसाधारण * परकीय शत्रूपासन मोठा त्रास वाढणार जळगाव जामोद (प्रतिनिधी)ः साडेतीनशे वर्षांपूवची परंपरा कायम राखत आज भेंडवळ येथे भाकीत वर्तविण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला ही घटमांडणी करण्यात आल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यानुसार या घटमांडणीमधून यंदा देशावर मोठे संकट, राजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा … Read more

वाहनासह 38 लाख 68 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त

जलंब पोलिसांची कामगिरी,गुटखामाफीयांचे दणाणले धाबे खामगाव (प्रतिनिधी)ः मध्यप्रदेशमधून खामगावकडे येणारा अवैध गुटखा जलंब पोलिसांनी सापळा रचून नांदुरा मार्गावरील लांजुळ फाट्याजवळ पकडल्याची घटना 10 एप्रिल रोजी दुपारी घडली. यावेळी जलंब पोलिसांनी 24 लाख 68 हजार 80 रूपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहन अंदाजे किंमत 15 लाख रू. असा एकुण 38 लाख 68 हजार … Read more

खामगाव-शेगाव मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

पाच जणांचा मृत्यू तर 24 प्रवाशी जखमी खामगाव (प्रतिनिधी)ः शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि बोलेरो अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना आज 2 एप्रिल रोजी सकाळी घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो (एम.एच 28-3314 ही शेगाव वरून खामगाव कडे येत असताना, पुणे येथून … Read more

नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली, तिघांचा मृत्यू

 चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळील घटना, बुलडाणा हादरला चिखली-महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक जणांचा यात जीव देखील जातो. असाच एक भीषण अपघात चिखली त्ो जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला आहे. दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी झाडावर आदळली. या दुर्घटनेत दुचाकीवरील तिघेही युवक … Read more

ज्येष्ठ पत्रकार राजीव तोटे यांना पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

खामगाव (अमोल बुट्टे)- बुलडाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मराठी व हिंदी दैनिकात कार्यरत असणारे शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक कलम क्रांतीचे संपादक राजीव रामचंद्र तोटे यांना मराठी पत्रकार परिषदच्या वतीने बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाने पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर केला आहे. यासाठी त्यांना 16 फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथील गर्दे हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा डॉक्टर पतीने केला खून

दाभाडी येथील दरोडा प्रकरण बनावट असल्याचे उघडकीस मोताळा (प्रतिनिधी)ः तालुक्यातील दाभाडी येथील दरोडा प्रकरण बनावट असल्याचे समोर आले असून डॉ.गजानन टेकाळे यानेच पत्नी माधुरी टेकाळे यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ.टेकाळे याने परस्त्रीशी असलेल्या अनैतिक संबधात अडसर येणाऱ्या पत्नीला झोपेच्या गोळ्या देवून उशीने तोंड दाबून खून केल्याची कबुली बोराखेडी पोलिसांना चौकशी दरम्यान … Read more

पाहा कोणाला मिळाले कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद?

ना.मकरंद जाधव बुलढाण्याचे तर आ.ना.आकाश फुंडकर अकोल्याचे पालकमंत्री! खामगाव (प्रतिनिधी) ः महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद … Read more

पैशाच्या वादातून केला भावाचा खून

दोन महिला गंभीर, माटरगाव येथील घटना शेगाव (प्रतिनिधी): पैशाच्या वादातून भावानेच आपल्या चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. तसेच दोन महिलांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना आज दुपारी शेगाव तालुक्यातील माटरगाव बु. येथे आज घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून शत्रुघ्न मिरगे रा. माटरगाव व त्याचा चुलत भाऊ सोपान मिरगे रा. भास्तन … Read more

जुन्या एसटी बसमधून प्रवासी नागरिकांचा जीवघेणा प्रवास

खामगावः(गावाचा प्रश्न वृत्तसेवा): सध्या राज्यभर महामंडळाच्या बसेसच्या भंगार स्थितीची अनेक उदाहरणे समोर येत असताना आता खामगाव आगाराच्या बसेसचे सुध्दा विदारक चित्र दिसून येत आहे. काल 13 जानेवारी रोजी खामगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या बसच्या डिझेल टँक जवळील वायरिंग जळाल्याने धूर निघत होता. ही बाब एका प्रवाशाच्या लक्षात येताच पुढील अनर्थ टळला. अशी घटना दिवसभरात कुठे तरी एखादी … Read more