न. प. प्रशासन की स्थानिक नागरिक, पण तोडगा काढणे आवश्यक
खामगाव (अमोल बुट्टे): स्थानिक बाळापूर फैल भागात मागील एक महिन्यापासून काही घरांच्या नळामध्ये पाणी येत नसल्याने संबंधितांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुध्दा न.प. कडून दखल घेतल्या गेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष उफाळल्याने आज ४ डिसेंबर रोजी सकाळी न. प. पाणी पुरवठा विभागासह काही अधिकारी – कर्मचारी यांनी या भागात भेट देऊन त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले देऊन काही घरातील नळांचा पाणीपुरवठा आजच सुरू करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना शांत केले. परंतु या भागात काही लोकांनी अनाधिकृत नळ कनेक्शन घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे या भागातील एका महिलेने आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे न.प. प्रशासनसुध्दा हतबल झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईनचे काम सुरू असतानाच काही नागरिकांनी मेन पाईप लाईनवरून अनाधिकृत नळ कनेक्शन घेणे सुरू केले होते. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सुध्दा हतबल झाले होते. परंतु आता ज्यांच्याकडे पाणीपट्टी भरल्याची पावती आहे. त्यांची नळजोडणी करून पाणी पुरवठा करण्यासाठी न.प. कडून युध्दस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे बाळापूर फैलातील पाणी समस्येला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात सुद्धा तक्रारी केल्याचे समजते.