कुटूंबियांना मारहाण करुन दोन नराधमांनी केला महिलेवर अत्याचार

मलकापूर (प्रतिनिधी)ः राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न कायम असून, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. मलकापूर तालुक्यात अशीच एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात 21 वषय गर्भवती शेतमजूर महिलेवर दोन व्यक्तींनी लोखंडी विळा उगारत अत्याचार केला आणि पीडितेच्या सासु व पतीला मारहाण करून पोबारा केला आहे. गावातील एका शेतात पीडित महिला पती, मुलगा व सासूसह राहते. 10 जुलै च्या रात्री 11.30 वाजता च्या दरम्यान मोहन बरेला व त्याचा साथीदार पीडीतेच्या घरात घुसले. आरोपींनी लोखंडी विळा व वीटाने सासू व पतीला मारहाण करून जखमी केले. त्यानंतर पीडीतेला अपहरण करून बहापूरा शिवारातील बेलाड फाटा परिसरात नेऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पिडीतेने याबाबत पोलिसांना तक्रार दिल्यावरून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment