खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर

49 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राजा
खामगाव (प्रतिनिधी)ः ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 30 (4)(5) तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार, खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आज तहसील कार्यालय खामगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुनील पाटील होते.
आरक्षण सोडतीमध्ये 97 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायतीमध्ये महिला राज राहणार आहे. यात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व अन्य मागासवगय (ओबीसी) महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांनाही संधी मिळाली आहे. अनुसूचित जातीसाठी जयरामगड, कंझारा, शिर्ला नेमाने, सुटाळा बु, कुंबेफळ, ढोरपगाव, गारडगाव, भालेगाव, खामगाव ग्रामीण, अटाळी तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी घारोड, हिवरखेड, निपाणा, निरोड, कोंन्टी, काळेगाव, जनुना, शिरसगाव दे., पिंपरी कोरडे, चिंचपूर, सुटाळा खु. या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी खोलखेड, कंचनपूर तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गात रोहणा व उमरा अटाळी या गावांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी लोखंडा, निळेगाव, माटरगाव, खुटपुरी, पिंप्राळा, जयपूर, लांडे आडगाव, कारेगाव बु., वाकुड, शिराळा, रामनगर, हिवरा बु. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील महिलांसाठी वडजी, दधम, विहीगाव, पिंपळ राजा, टेंभुर्णा, लाखनवाडा बु., बोरजवळा, पळशी खु., पिंपरी गवळी, पिंपरी धनगर, माक्ता मांडका, लाखनवाडा खु. या ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले आहे. सर्वधारणसाठी वझर, किन्ही महादेव, नायदेवी, झोडगा, नांद्री, कवडगाव, दिवठाणा, नागापूर, लोणी गुरव, जळकातेली, बोरी, घाटपुरी, पाळा, वर्णा, संभापुर, गोंधापुर, आंबेटाकळी, अत्रज, कदमापूर, अंबिकापूर, आवार, हिवरा खु. तर सर्वसाधारण महिलांसाठी पळशी बु., वाडी, ज्ञान, गंगापूर, पारखेड, गणेशपुर, घाणेगाव, आसा, बोथाकाजी, हिंगणा कारेगाव, सजनपुरी, राहूड, शहापूर, टाकळी, लाजुड, कोलोरी, पोरज, शेलोडी, पिंपरी देशमुख, गवढाळा, सुजातपूर, जळका, भडंग या ग्रामपंचायतींमध्ये संधी मिळाली आहे. एकुणच खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीवर महिला राज राहणार आहे.

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची विकेट
राजकीयदृष्टया महत्वपूर्ण असणारी अनेक गावे राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक जणांची विकेट पडली आहे. अनेक गावात आरक्षणाने अचानक लॉटरी लागली आहे. तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव झाले असल्याने तालुक्यातील निम्म्या गावात महिला राज राहणार आहे. एकंदरीत कही खुशी कही गमची स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एकुणच 97 पैकी 49 गावांत सरपंच पदासाठी विविध आरक्षणे पडल्याने अनेकांना किंगमेकरची भूमिका बजवावी लागणार आहे.

Leave a Comment