विठ्ठल दर्शनाहून परतणाऱ्या वारकऱ्यांची बस पलटी, 30 वारकरी जखमी

देव तारी त्याला कोण मारी! विठुराया आला मदतीला धावून, सर्व भाविक सुखरुप
खामगाव (प्रतिनिधी): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आटोपून परतत असलेल्या वारकऱ्यांच्या एस.टी. बसला चिखलीजवळ अपघात घडल्याची घटना आज पहाटे 4 वाजता दरम्यान घडली. या अपघातात सुमारे 30 वारकरी जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने येत होती. या बसमध्ये 53 भाविक होत्ो. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. 40 वाय 5830 ही चिखली शहराजवळ पोहोचली असता, महाबीज प्रक्रिया केंद्राजवळ हा अपघात झाला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला आदळली. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने म्हणा की वारकऱ्यांच्या शब्दात सांगा, देव तारी त्याला कोण मारी! विठुरायाच्या कृपेने आशीर्वादाने प्राण हानी झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली आणि सर्व भाविकांना बसमधून बाहेर काढले. या अपघातात काही भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. विठुरायाच्या कृपेने मोठा अपघात टळला आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी भाविकांची प्रकृती स्थिर आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भाऊसाहेब शोनाजी थांडे (वय 45, रा. तळेगाव), पुष्पा विनोद शिंगणे (वय 39, रा. त्ोल्हारा). प्रदीप रघुनाथ धर्मसकर (वय 48, रा. दहीगाव). विठ्ठल त्ुालसीराम पांडे (वय 37, रा. तळेगाव), रामप्रसाद हरिभाऊ पांडे (वय 60, रा. तळेगाव), सुरेश दिगंबरराव फोकमारे (वय 60, रा. सवदंरा), शोभा झोरे (वय 60, रा. जानोरी रोड), गोविंद वासुदेव पांडे (वय 60, रा. वडेगाव), त्ुाकाराम पांडुरंग कोकरे (वय 69, रा. बाळापूर), ईश्वर हरिचंद्र मोरे (वय 65, रा. जवळा), रुख्मीना वसंत इंगळे (वय 62, रा. बाळापूर), सुजाता राहुल वानखेडे (वय 30, रा. चिखली), शिवाजी सुभाष जाधव (वय 32, रा. अन्वा), नर्मदा अवचित मोरे (वय 45, रा. मिराळवाडी, चिखली), आकाश अशोक डोके (वय 45, रा. मंगरुळ-नवघरे) यांचा समावेश आहे.

नेमकं घडलं काय?
आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर आषाढी वारी आटोपून खामगावकडे जात असलेली एसटी बस बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर आली असताना बस दुभाजकावर आदळून पलटी झाली. या बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होत्ो. या भीषण अपघातात सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले.

Leave a Comment