* ‘जनसुरक्षा’ विधेयक रद्द करण्याची मागणी * हुकूमशाहीविरोधात हाक
खामगाव (प्रतिनिधी) ः भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा असून या कायद्या विरोधात आज 10 सप्टेंबर रोजी खामगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनत्ोच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत व्हावी, हाच कुटील हेत्ूा या विधेयकाच्या माध्यमात्ूान साधला जाणार आहे. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांंचेविरूध्द खोट्या कारवाया करण्यात येतील, अशी भिती विविध संघटना व विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. अशा या लोकशाही विरोधी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष व महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. याअंतर्गत आज खामगाव येथे सर्वप्रथम विश्वरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनसुरक्षा कायद्या विरोधात जोरदार निदर्शन करून सरकारने तात्काळ हे विधेयक रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, खामगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, डॉ.विप्लव कविश्वर, शिवसेना माजी विधानसभा संघटक रवि महाले, कॉ. जितेंद्र चोपडे, शिवसेना तालुका अध्यक्ष श्रीराम खेलदार, शिवसेना शहर अध्यक्ष रवी जैन, कैलास फाटे, अनंतराव ताठे, गजानन वाकुडकर, बबलू पठाण, लोमेश भोयर, अनिल ठाकरे, तुशार सोनोने, पांडुरंग राखोंडे, शे.शब्बीर शे.बुढन, बाबा काळे, असलम पटेल, तहसीन शाह, प्रणव जोशी, पंकज घोगले, रूषी भोसले, विशाल कवठेकर, अक्षय शंकरवार, काशिनाथ मुऱ्हे, महादेव फासे, रामचंद्र भारसाकळे, गजानन होगे, सुरज बेलोकार, अहमद अनसारी, बबलू भटकर, सय्यद जाफर, गजानन माने, अजय पवार, अजय तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
