नवीन वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

नवीन वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

डीएपी, टीएसपी आणि १०:२६:२६ तसेच १२:३२:१६ या खतांच्या किमतीत वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येणार आहे. आधीच खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनले असताना त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. यात रासायनिक खतांची भूमिका आणखी महत्वाची असते. दरम्यान, सततच्या दरवाढीला विरोध करत सरकारकडून या वाढीव दरांचे पुनरावलोकन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Leave a Comment