पेनटाकळी धरणातून विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मेहकर (प्रतिनिधी)ः काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेनटाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर, पेनटाकळी, पाचला भालेगा?व तथा आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उरली सुरली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहे.
काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेल्या सोयाबीन पिकांना पेनटाकळी धरणामुळे मोठा फटका बसला आहे. पेनटाकळी धरणाचे आत्तापर्यंत २५ वेळा दरवाजे उघडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग पैनगंगा नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या जवळपास ३२०० हेक्टर वरील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह शेतजमिनीला मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या शेत जमिनीचा खरडून गेल्याचा सर्वे करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment