खामगाव (प्रतिनिधी)ः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका कंटेनरमधून सुमारे 25 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना एका वाहनातून प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता 3 सप्टेंबर रोजी दुपारी पथकाने पारखेड फाट्याजवळ नाकाबंदी करून कंटेनर क्र. जीजे 01 डीएक्स- 7341 ची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु 11 गोण्यांमध्ये भरलेला मिळून आला. एकूण 25 लाख 35 हजाराचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी कंटेनर व गुटखा जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये कंटेनर चालक रामराज दुलारे (वय 49, रा. सिकरोढी, पो.रेवाडी बु. जि. फतेहपुर उत्तर प्रदेश व मोहम्मद नासीर रा. अहमदाबाद या दोघांविरूध्द कलम 223, 274, 275, 123, 3 (5) भारतीय न्याय संहिता सह कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2) (i) सह वाचन कलम 26 (2) (iv) सह वाचन कलम 27 (3) (d) सह वाचन कलम 27 (3) (e) सह वाचन कलम 3(1) (zz) (iv), शिक्षापात्र कलम 59 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिपोअ निलेश तांबे, एएसपी श्रेणीक लोढा, एएसपी अमोल गायकवाड, स्थागुशा पोनि सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, चालक निवृत्ती पुंड यांच्या पथकाने केली.