दोन बिबट्यांच्या झुंजीत एक गंभीर!

लाखनवाडा खु. शिवारातील घटना
जखमी बिबट्याला केले जेरबंद
खामगाव- तालुक्यातील लाखनवाडा खुर्द शिवारातील जंगलात दोन बिबट्यांमध्ये कडवी झुंज झाली. यात एक बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना 16 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. वनविभागाच्या रेस्क्यु टीमने जखमी बिबट्याला जेरबंद करून नागपूर येथील प्राणी संग्रहालयात उपचारार्थ पाठविले आहे.
तालुक्यातील लाखनवाडा वन परिक्षेत्रातील जंगलात वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर आहे. ग्रामस्थांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असत्ो. 16 जुलै 25 रोजी लाखनवाडा खुर्द शेत शिवारातील घनदाट झाडीमधे एक बिबट्या जखमी अवस्थेत दडून बसला असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होत्ो. तर याबाबतची माहिती खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांना कळविण्यात आली. यानंतर वनविभागाचे रेस्क्यु पथक त्याठिकाणी पोहोचले व बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या डोक्याला मोठी जखम झाली असल्याने रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. जखमी बिबट्याला खामगाव येथील वन परिक्षेत्र कार्यालयात आणून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बिबट्याला नागपूर येथील प्राणी संग्रहालयात रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड, वनपाल पि. के. मिसाळकर, भागनागरे मॅडम, शिंदे मॅडम, लाखनवाडा बीटचे पोहेकाँ. आनंद वाघमारे, पोकाँ. अमोल राऊत, अहेमद खान यांनी केली. यावेळी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.