October 20, 2025 5:22 am

बकरी ईद व सण उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक

खामगाव (प्रतिनिधी) ः बकरी ईद व सण उत्सवानिमित्त शहरातील जातीय सलोखा आणि भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी तसेच येथील कायदा सुव्यवस्था योग्य ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्सवा दरम्यान कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. बकरी ईद या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज 3 जून रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास शहर पोस्टेच्या सभागृहात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी त्ो बोलत होत्ो. यावेळी एएसपी डॉ. श्रेणीक लोढा, एसडीपीओ प्रदिप पाटील, तहसीलदार सुनिल पाटील, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. सोनकुले मॅडम उपस्थित होत्ो. यावेळी शांतता समितीचे सदस्य रामदादा मोहित्ो, अशोकभाऊ सोनोने, मौलवी मो. युनुस, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय बडगुजर, ॲड. इखारे, डॉ. गुरफान खान यांनी मार्गदर्शन करून ईद सण उत््‌ासाहात व शांतत्ोत साजरा करण्याचे आवाहन केले. संचालन शहर पोस्टेचे ठाणेदार रामकृष्ण पवार तर आभार प्रदर्शन शेगाव ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार पाटील यांनी केले.4-1-2

Gavacha Prashna
Author: Gavacha Prashna