October 20, 2025 2:15 am

विशेष बातम्या

विजयलक्ष्मी सुपरमार्टची दिवाळी बचत योजना

खामगावः स्थानिक चिखली रोडवरील विजयलक्ष्मी ग्रुपच्या वतीने ग्राहकांना एकाच छताखाली सर्व दर्जेदार वस्तू योग्य दरात मिळत असून ‘दिवाळी बचतवाली योजना’ मुळे ग्राहकांचा कल वाढला आहे. एन. टी. बाप्पू देशमुख व अजिंक्य देशमुख यांनी लावलेले तेव्हाचे रोपटे आज वटवृक्षाप्रमाणे बहरत आहे. ग्राहकांना दर्जेदार व योग्य भावात एका छताखाली वस्तू मिळाव्या यासाठी विजयलक्ष्मी ग्रुप सुरू केले. विजयलक्ष्मी ग्रुपतर्फे दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष. ऑफर देण्यात आली आहे.२१०० रुपयाच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली, सावजी काळा मसाला रू. १०, स्वाद चहा पॅक रू. १० तर ३१०० रूपयांच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली, सावजी काळा मसाला रू. १०, स्वाद चहा

राजकारण

खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर

49 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राजा खामगाव (प्रतिनिधी)ः ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 30 (4)(5) तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार, खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आज तहसील कार्यालय खामगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुनील पाटील होते. आरक्षण सोडतीमध्ये 97 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायतीमध्ये महिला राज राहणार आहे. यात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व अन्य मागासवगय (ओबीसी) महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांनाही संधी मिळाली

देश