October 20, 2025 5:22 am

खामगाव नगर परिषदेवर राहणार महिलाराज

17 प्रभागातील 35 नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर
खामगाव (प्रतिनिधी)ः आगामी खामगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून या आरक्षणाची आत्ुारत्ोने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या उत्सुकत्ोचा परमोच्च बिंदू गाठला असून आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकारण नव्या चर्चांनी गजबजले आहे. खामगाव येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील आरक्षण 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आले. खामगाव नगर परिषदेच्या 17 प्रभागांतील 35 नगरसेवक निवडून येणार आहे. त्यामध्ये 18 महिला व 17 पुरुषांंचा समावेश आहे.
प्रभागनिहाय प्रभाग खालील प्रमाणेः
प्रभाग क्र. 1 ः अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण पुरुष.
प्रभाग क्र. 2 ः अ- ओबीसी पुरुष, ब-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 3 ः अ- अनुसुचित जाती महिला, ब- सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. 4 ः अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. 5 ः अ – सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. 6 ः अ – ओबीसी पुरुष, ब- सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 7 ः अ – अनुसुचित जाती महिला, ब- सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. 8 ः अ – सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. 9 ः अ-ओबीसी पुरूष, ब- सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 10 ः अ – ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण पुरूष,
प्रभाग क्र. 11ः अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. 12 ः अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष,
प्रभाग क्र. 13 ः अ – ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्र. 14 ः अ – ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र.15 ः अ – अनुसुचित जाती पुरूष, ब – सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 16 ः अ-अनुसुचित जाती पुरूष, ब – सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 17 ः अ – ओबीसी पुरुष, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी कल्पेश तायडे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, उपमुख्याधिकारी आनंद देवकत्ो हे उपस्थित होत्ो. यावेळी शाळा क्र. 6 च्या विद्याथनी आरूषी महादेव हरमकार, स्वरा प्रदीप बुंदे, कृष्णाली रामचंद्र टाले, लाभीका नित्ोश चंदेल व वेदांती सुरेश धंदर यांच्या हस्त्ो ईश्वरचिठ्ठी काढुन प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले.

Gavacha Prashna
Author: Gavacha Prashna